सातारा जिल्ह्यात प्रारंभी पोलीस खाते चालविणार 3 पेट्रोल पंप
सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : पोलीस कल्याण निधीसह पोलीस खात्याला कायमचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी पोलीस दलातर्फे लवकरच पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत. सातारा येथे पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यात वडूज व कराड येथे दोन पोलीस ठाण्यातंर्गत तीन पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहे. भारत पेट्रोलियम कंपनीकडून पेट्रोल पंप सुरू करण्याच्या सगळ्या कागदोपत्री पूर्तता झाली आहेत. विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रत्यक्षात पेट्रोल पंप सुरू होतील, अशी माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पोलीस दलास कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळावे. पोलीस कल्याण निधीसाठी त्याचा चांगला वापर करता यावा, यासाठी शासनाने योजना राबवली. त्यातंर्गत सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप उभा करण्यात येणार आहेत. पोलीस कल्याण निधीसाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे त्याला पोलीस खात्यांच्या वरिष्ठ कारायलयाकडून मंजूरी अत्यावश्यक असते. त्यासाठी सहा प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. त्यापैकी सातारा पोलीस मुख्यालय, कराड व वडूज हे तीन प्रस्ताव मंजूरीच्या अंतीम टप्प्यात आहेत. त्यासाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. भारत पेट्रोलियम कंपनीकडून त्याची पूर्तता करण्यात आली आहे. ते प्रस्ताव पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयात गेले आहेत. तेथे मंजूर होवून ते प्रस्ताव लवकरच येथे मिळणार आहेत. ती अंतीम मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात पेट्रोल पंप सुरु होणार आहेत. त्यासाठी पोलीस खात्यातंर्गत मंजूरीची मिळणे बाकी आहे. काही दिवसात मंजूर मिळेल त्यानंतर पेट्रोल पंप सुरू होतील.
प्रथम कराडच्या कार्वे नाका येथील जागेत पेट्रोल पंप सुरू होणार आहे. त्यानंतर वडूज येथे पोलीस परेड मैदानाची जागा पेट्रोल पंपासाठी आरक्षित करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयातील बाहेर सध्याच्या पार्कींगच्या जागेवर पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात सहा ठिकाणी पेट्रोल पंप सुरु करण्याचे प्रस्ताव तयार आहेत. त्यापैकी वरील तीन प्रस्ताव पाठवून देण्यात आले आहेत. त्यांना शासन, पेट्रोल पंपाची कंपनीस्तारवर मंजूरी मिळाली आहे. कराड, वडूज व पोलिस मुख्यालयात पेट्रोल पंप होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अन्य तीन ठिकाणचे प्रस्ताव तयार आहेत. मात्र, वरील तीन पेट्रोल पंप प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर उर्वरित तीन प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यात ओगलेवाडी, ता. कराड, लोणंद व पुसेगाव, ता. खटाव येथील पोलीस ठाण्यांचा त्यात समावेश आहे. त्या तिन्ही ठिकाणीजागा पाहण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंपासाठी आवश्यक तेवढी जागा तेथे उपलब्ध आहे. त्यामुळे त्याही ठिकाणचे प्रस्ताव लवकरच पाठवले जाणार आहेत.
’सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे तीन प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्याला मंजूरी घेण्याचे काम सुरू आहे. पोलीस खात्यातील काही महत्वाच्या मंजूरी बाकी आहेत. त्या मिळाल्या की, पोलीस खात्याचे पेट्रोल पंप सुरू होतील. त्याला काही अवधी जाईल.’ अशी माहिती सातार्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.