Breaking News

महिला बचत गटांच्या पोषण आहाराची देयके तात्काळ वितरीत करणार -पंकजा मुंडे


मुंबई, - राज्यातील महिला बचत गटाच्या पोषण आहारासाठी 400 कोटीचा निधी तात्काळ वितरीत करण्यात येत आहे. महिला बचत गटांची 522 कोटी रुपयांची प्रलंबित देयके वितरीत करण्यासाठी उपलब्ध झाल्यास अखर्चित निधी वळवून अन्यथा या वर्षीच्या अर्थसंकल्पात अतिरिक्त मागणीसह निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रलंबित देयकांमुळे राज्यात कोणत्याही जिल्ह्यात पोषण आहाराचा पुरवठा बंद झालेला नाही, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत आज स्पष्ट केले.