Breaking News

गुलाबी बोंडअळीमुळे विदर्भात 10 लाख एकरावरील पिकांचे नुकसान


नागपूर,- गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये राज्यात गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे तसेच तुडतुडे किडीच्या प्रार्दुभावामुळे धान पिकाचे नुकसान झाले. यामध्ये नागपूर विभागात म्हणजेच पूर्व विदर्भात एकूण 10 लाख 93 हजार 968 एकरावरील (4,37,587.26 हेक्टर) कापुस पिकाचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आली आहे.