Breaking News

चिमुकल्यांच्या कलागुणांनी उपस्थित भारावले खेडच्या मपरिवर्तनफचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कर्जत तालुक्यातील खेडच्या परिवर्तन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी उपस्थित मान्यवर भारावून गेले. बक्षिसांच्या वर्षाव करित टाळ्यांचा ठेका धरत चिमुकल्यांच्या सादरीकरणाला दाद दिली. लोकनायकचे प्राचार्य चंद्रकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.राशिनचे उद्योजक मेघराज बजाज व कावळवाडीचे सरपंच गणेश करे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.


संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, विश्‍वस्त तसेच व्यवस्थापनच्या अध्यक्षा डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनी भेट देवुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी पं. स. सदस्य आण्णासाहेब मोरे, युक्रांदचे नवनाथ जांभळकर, पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे, प्राचार्या नेहा जोशी, सोमनाथ गोपाळघरे, डॉ. सुभाष शिंदे, सुनील जाधव, विशाल देशमुख, बांधकाम व्यावसायिक गोसावी, केंद्रप्रमुख मधुकर ओहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध रोपांची भेट देवून अनोख्या पध्दतीने मान्यवरांचे स्वागत केले. आण्णासाहेब मोरे, मेघराज बजाज, गणेश करे यांची भाषणे झाली. कला, क्रीडा आदींमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना करे यांच्या सौजन्याने ट्रॉफी व चषक प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांना खेड पंचक्रोशीतील उपस्थित ग्रामस्थ, पालकांनी चांगलीच दाद दिली. उद्योजक मेघराज बजाज यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करित पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले. शितल भोसले, तृप्ती भारती, प्रियांका दडगळ, पल्लवी पिसाळ, मेहजुबिन शेख, रेणुका वाघमारे, रुपाली मगर, राणी काळे, राजेंद्र काळे, अमोल देमुंडे तसेच सेवक महेंद्र देशमुख, अनिता घोडके, शमशाद मुंडे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सुत्रसंचालन तृप्ती भारती, अमोल देमुंडे यांनी केले.प्राचार्या नेहा जोशी यांनी आभार मानले.