Breaking News

प्रज्ञाशोध परीक्षेत जय जगताप जिल्ह्यात तृतीय


कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील जय शरद जगताप याने प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्ह्यात तृतीय तर कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केला. त्याने परिक्षेत 300 पैकी 256 गुण संपादन केले. केडगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देवून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
कर्जतच्या श्री रविशंकर विद्यालयात सातवीच्या वर्गात जय शिकत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, पुणे जिल्हा भाजपा प्रवक्त्या तसेच पालक शरद जगताप, शोभा जगताप आदींच्या उपस्थितीत त्याचा सन्मान करण्यात आला. जयच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.