Breaking News

परीक्षा केंद्र संचालकाला झालेल्या मारहाण प्रकरणी कठोर कार्यवाही करा ,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी


अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या संचालकांना झालेल्या मारहाणी केल्याप्रकरणी पोलिस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले. अशा गावगुंडाला त्वरित अटक करावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. नवनाथ टकले, प्रा. भास्कर जर्‍हाड, प्रा. भाऊसाहेब कचरे, प्रा. सोपान कदम, प्रा. उद्धव उगले, प्रा. उत्तम गागरे, प्रा. रविंद्र देवढे, प्रा. भाऊसाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल खर्डा ता. जामखेड येथे 26 फेब्रुवारी 2018 रोजी केंद्रसंचालक श्रीराम सदाशिव मुरुमकर यांना गावगुंडांनी कॉपी पुरविण्यास मज्जाव केल्यामुळे मारहाण केली आहे. सदर गुन्हा पोलीसांनी नोंदवून घेतलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपीस पोलीसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे तेथील पर्यवेक्षक मानसिक दडपणाखाली पर्यवेक्षणाचे काम करत आहेत. यापूर्वी देखील पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा, देवळाली प्रवरा अशा ठिकाणी पर्यवेक्षकांना मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी आपण या घटनेची गंभीर दखल घ्यावी. जिल्ह्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून आरोपीस त्वरित अटक करण्याचे आदेश द्यावेत व कठोर शिक्षेची शिफारस करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.