Breaking News

पारनेर महविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन


पारनेर/प्रतिनिधी : न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लाईफ स्कील्स, व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत पद्युत्तर विज्ञान विभागातील पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. 

कार्यशाळेचे उद्घाटन शोध ऍडव्हानटेक औरंगाबादचे व्यवस्थापकीय संचालक मैत्रेय मुदकवी यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलीप ठुबे, डॉ. अविनाश मंचरकर , प्रा. प्रदिप मुटकुळे उपस्थित होते.

मैत्रेय मुदकवी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असून देखील नोकरीच्या संधी मिळत नाहीत. कारण विद्यार्थ्यांना मुलाखतीमध्ये यशस्वी व्हावयाचे असेल तर उत्कृष्ट संभाषण कौशल्य, टीम वर्क, नेतृत्व गुण, सादरीकरण, सकारात्मक दृष्टिकोन इ . कौशल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मुदकवी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रम व छोटे प्रकल्प यांचे सहाय्याने व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले व करीयरसंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदिप मुटकुळे यांनी केले. प्रा. अनिल ढोले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. सागर म्हस्के यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ .प्रशांत रोहोकले, वैभव घोलप यांनी विशेष परिश्रम घेतले.