Breaking News

कर्जत शहर हागणदारी मुक्तीची वाटचाल पुर्णत्वाकडे


स्वच्छ भारत अभियानांतर्गत कर्जत शहराची हागणदारीमुक्ती करणाची 100 टक्के वाटचाल झाली असून शहरात उघड्यावर शौचास जाणार्‍यांची संख्या जवळ-जवळ संपुष्टात आली आहे. अगदी काही दिवसांमध्ये कर्जत नगरपंचायतीने या अभियानाचा कर्जत हागणदारीमुक्तीचा ध्यास घेवून हे अभियान वर्षापासून राबवित आहे. आपल्या शहरातील, वाडी वस्तीवरील प्रत्येक नागरिक हा आपल्या स्वतःच्याच शौचालयात शौचास गेला पाहिजे असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून कर्जत नगर पंचायतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके यांचे बरोबरच सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मुख्याधिकारी पिंजारी यांनी प्रयत्न करून प्रत्येक वॉर्ड, वाड्या-वस्त्यांवर बैठका घेवून नागरिकांना शौचालयाचे महत्व पटवून दिले. तसेच नागरिकांना शौचालय बांधण्यास प्रोत्साहित केले. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या कुटूंबांना त्यांनी रेडिमेड शौचालये उपलब्ध करून दिली. त्याचाही बहुतांश कुटुंबांनी फायदा घेतला. ही कुटूंबे आज उघड्यावर शौचास न जाता आपल्या स्वतःच्या शौचालयात शौचास जात असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पिंजारी यांनी प्रसिद्धीत्रकाद्वारे दिली.
तसेच या योजनेच्या कामाची पाहणी प्रथम जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात आली. त्यानंतर राज्यस्तरीय समितीमार्फतही कर्जत शहराची विषयांतर्गत पाहणी केली. या दोन्ही समित्यांद्वारे योग्य गुणांकन केल्यानंतर केंद्र शासनाच्या समितीद्वारे कर्जत शहराची पाहणी करून तपासणी झाली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.