Breaking News

कळस उपसरपंचपदी पांडूरंग येवले


निर्मलग्राम कळस, ता. पारनेर येथील उपसरपंचपदी पांडूरंग येवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निर्मलग्राम कळस सरपंच मंजुषा विठ्ठल गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये उपसरपंच पांडूरंग येवले यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ग्रामसेवक के. डी. अकोलकर यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, मा. उपसरपंच भरतरी काणे, मा. सरपंच महादेव गाडगे, गणेश काणे, सुरेखा गाडगे, सविता गाडगे, सुशाबाई गाडगे, आश्‍विनी गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.


पं. स. सदस्य रोहिणी काटे, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष मधुकर उचाळे, पारनेर मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत गायकवाड, पारनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, मा. शिवसेना तालुकाध्यक्ष निलेश लंके, प्रसन्ना उद्योग समुहाचे चेअरमन किरण डेरे, सोसायटी चेअरमन सुर्यकांत काणे, माजी पं. स. सदस्य निवृत्ती गाडगे, अळकुटी ग्रा. पतसंस्थेचे चेअरमन महेश शिरोळे, संचालक भाऊ गाडगे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय गाडगे, भानुदास मोकाशी, शांताराम गलांडे, भाजप प्रसिध्दी प्रमुख कल्याण गलांडे, दत्ता गाडगे, रामदास गाडगे, साहेबराव गाडगे, इंद्रभान गाडगे, शिरीष गाडगे, पोपट झिंजाड, यादव गाडगे, अळकुटी चेअरमन बाळासाहेब पुंडे, सरपंच बाबाजी भंडारी, सामाजिक कार्यकर्ते सचिन साखला, रांधे उपसरपंच संतोष काटे, अनिल गलांडे, शांताराम येवले, किसन कुटे, अजित क्षिरसागर, डॉ. रविंद्र येवले, हनुमंत गाडगे, डॉ. उत्तम थोरात, रविंद्र गोरडे, दशरथ गाडगे, अतुल भांबरे, सतिश पिंपरकर, ठकाराम लंके, बबन तनपुरे, बाबाजी गाडगे, संपत गाडगे आदींनी अभिनंदन केले.