Breaking News

शाळेत विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला; बामणोदमधील प्रकार


जळगाव, दि. 10, मार्च - यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कुलमध्ये शुक्रवारी, सकाळी पावणेअकराच्या सुमारास इयत्ता दहावीचा पेपर सुरु होण्यापूर्वी विद्यार्थांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने चौघांवर चाकुने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. परीक्षार्थीस पीएसएमएस हायस्कूलमध्ये सोडण्यासाठी आल्यानंतर तरुणांमध्ये वाद झाल्याने अंजाळेच्या तरुणाने मिनी कटर (चाकू) ने हल्ला केल्याने या चाकु हल्ल्यात रूपेश गुणवंत ननवरे(वय 19),गौरव अरूण सोनवणे(वय 15),सागर भिमराव सोनवणे(वय 22),मोहित गोपाळ सोनवणे(वय 18,सर्व रा.बामणोद)हे जखमी झाले. हल्ला करणा-या संशयितास फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती कळताच फैजपूरचे एपीआय दत्तात्रय निकम यांनी तातडीने धाव घेत शांतता प्रस्थापीत करून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करीत संशयितास ताब्यात घेतले.