Breaking News

चित्रभिंतीतून प्रसारित केला जातोय स्त्री सक्षमीकरणासोबतच शहर स्वच्छतेचा संदेश


नवी मुंबई, दि. 10, मार्च - ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ ला सामोरे जाताना विविध समाज घटकांचा शहर स्वच्छतेत सहभाग लाभत असून स्वच्छताविषयक जनजाग ृती मध्येही अनेक संस्था, उद्योगसमुह यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत टेक महिंद्रा फाऊंडेशन यांच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील क पास भवनच्या कुंपण भिंतींवर स्वच्छताविषयक संदेश व चित्रे चितारण्याचा अभिनव उपक्रम सीएसआर अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. 8 मार्चपासून 13 मार्चपर्यंत सकाळी 8.30 ते 10 आणि दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत ‘स्वच्छ सोच’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून भिंतींवरील चित्राच्या माध्यमातून परिसर सुशोभिकरणासोबतच ‘माझा कचरा ही माझी जबाबदारी’ अशी भूमिका नागरिक ांच्या मनात ठसविली जाणार आहे व स्वच्छतेविषयी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. याव्दारे सामाजिक संदेश प्रसारित केले जाणार असून सामाजिक जबाबदारीचे भानही करून दिले जाणार आहे. यामधून अंगभूत कलागुणांना वाव व मुक्त अवकाश देण्यासोबतच सामुहिकपणे चित्रे रंगविण्यातून एकतेचेही दर्शन घडणार आहे.
स्वच्छता हे केवळ सर्वेक्षणापुरते मर्यादीत राहू नये तर ती नागरिकांची नियमित सवय व्हावी या महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या भूमिकेला सुसंगत असा चित्रभिंतीचा अभिनव उपक्रम टेक महिंद्रा फाऊंडेशन यांच्या वतीने राबविला जात आहे.