Breaking News

अत्याचार पिडीत बालिकेस न्याय मिळावा म्हणून महा मूकमोर्चा

धुळे, दि. 10, मार्च - दोंडाईचा येथील पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सीआयडी चौकशी होवून पिडीत मुलीस न्याय मिळावा अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आज, सकाळी अकरा वाजता शहरातील मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन महामुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात जिल्हा प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले. मोर्चात जाती-धर्म-पक्ष-वैचारिक भेद बाजूला ठेवून जवळपास 88 सामाजिक व राजकीय संघटना आणि त्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. या निवेदनात, दोंडाईचा येथील पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी, सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे, याप्रकरणाची बालहक्क आयोगामार्फत चौकशी करुण सुनावणी घेण्यात यावी, तसेच हा खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे सो विण्यात यावा, पिडीत बालिकेला मनोधैर्य योजनेंतर्गत शासनाकडून मदत देण्यात यावी यासह विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या होत्या. या मोर्चात 300 मीटर लांबीचा काळा पट्टा असलेला कापड निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत नेण्यात आला.