Breaking News

‘आत्मा मालिक’मध्ये जागतिक वनदिन उत्साहात


कोपरगाव ता. प्रतिनिधी - येथील आत्मा मालिक संकुलात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने बुधवारी {दि. २०} महंत जंगलीदास महाराज यांच्या हस्ते बेलाचे झाड लावून जागतिक वनदिन साजरा करण्यात आला. 

वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी स्वागत केले. हरितसेना समन्वयक सुशांत घोडके यांनी प्रास्ताविक केले. ध्यान पिठाचे संत परमानंद महाराज, संत देवानंद महाराज, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सामाजिक वनीकरणाच्या अर्चना बोरसे, श्रध्दा पडवळ, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब होन, प्राचार्य निरंजन डांगे, जी. एन. कांबळे, एम. टी. बेलोटे, सुधाकर मलिक आदींसह शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.