जिल्हास्तरीय कंपोस्टिंग क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात
या कार्यशाळेत नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, आरोग्य समिती सभापती सोनाली शिंदे, प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविलाश गांगोटे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, आरोग्य निरीक्षक ज्ञानेश्वर मिसाळ, सुनिल मंडलिक आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील राहाता, अकोले, राहुरी, शिर्डी, पाथर्डी, श्रीगोंदा, कोपरगाव, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, नेवासा नगरपरिषदेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
नाशिक विभाग आयुक्त कार्यालयाच्या लिसा साहू व दीपिका लेले यांनी कचऱ्याचे कंपोस्टिंग कसे करावे, ते न केल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम, मानवी आजार याबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, सामाजिक, सांस्कृतिक, सहकाराचा वसा लाभलेल्या संगमनेर शहराला स्वच्छ सुंदर व हरित करण्याचा त्यांचा आहे. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी मोलाची साथ दिल्याचे त्यांनी सांगितले.