Breaking News

नशामुक्तीसाठी ‘त्या’ अवलियाचे सायकलवरून भारत भ्रमण


श्रीरामपूर प्रतिनिधी - देशातील तरुण नशामुक्त व्हावेत तसेच शिख धर्माचा प्रचार व्हावा, या उद्देशाने अमरदिप खालसा (वय ५७, रा. बेंगलोर) हे सायकलवरुन भारत भ्रमण करीत आहेत. आतापर्यंत्त त्यांनी २ लाख १५ हजार किलोमीटर अंतर १० वर्षे २ महिन्यात पूर्ण केले आहे. अजूनही त्यांना १ हजार किलोमीटर अंतर पार करायचे आहे.

खालसा यांनी ट्विटरवरुन अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना अमेरिकन भेटीचे निमंत्रण दिले आहे. त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून ५० हजार डॉलर (भारतीय ३० लाख रुपये) ते व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी त्यांना देणार आहेत. अमरदिप यांचा मुलगाही अमेरिकेत डॉक्टर (ई.एन.टी.सी.) आहे. बेंगलोरजवळील चिकतुरपती या गावातून ते सायकलवर निघाले आहेत. त्यांना १० वर्षे २ महिने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत्त त्यांना सात सायकली, पन्नास टायर, ट्यूब लागल्या आहेत. ३५ हजार शाळा व ५० हजार गावांना त्यांनी भेट देवून व्यसनमुक्तीचे महत्व सांगितले आहे. श्रीरामपुरात आले असता त्यांचा शिख बांधवांनी व शहरातील सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी त्यांनी आपल्या व्यसनमुक्तीचे व धर्मप्रसाराचे कार्याविषयी माहिती दिली. शिख समाजाचे लकी सेठी, ग्यानी अलोकसिंग मस्कीन, गुरुबच्चनसिंग चुग, डॉ. विजय तांबे, नगर अर्बन बँकेचे माजी संचालक दिपक दुग्गड, मंजितसिंग चुग, अमोलिकसिंग चुग, रिम्मी चुग, मिंकू चुग, सनी चुग, जसमितसिंग बतरा, जसपालसिंग बतरा, करण नवले आदी उपस्थित होते.