मराठी भाषा गौरवदिन साजरा
समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नित्यसेवा प्रतिष्ठानच्या स्मिता शिरोळे ह्या उपस्थित होत्या. आपल्या मनोगतातून त्यांनी विदयार्थ्यांनी मराठी भाषेचा आदर , सर्वंगीण महत्व पटवून दिले. या वेळी महाविद्यालयात सांस्कृतिक, विविध स्पर्धा, कविता वाचन, पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच भाऊसाहेब डेरेची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सपकाळेनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पारखेंनी केले. प्रास्तविक उपप्राचार्य चाटेंनी केले. आभार प्रदर्शन कुंदा कवडेनी केले.