Breaking News

राहुरी महाविद्यालयातील विद्यार्थीनींना महिला दिनाची अनोखी भेट


राहुरी /प्रतिनिधी /- राहुरीच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महाविद्यालयात ४६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यामध्ये मुलींची संख्या ५५ % पेक्षा जास्त आहे.डॉ.बा.बा.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा.उदयसिंह पाटील उपाध्यक्ष मा.शामराव पाटील निमसे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी पठारे आणि कॉलेज विकास समितीचे सदस्य यांच्या पुढाकाराने आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने महविद्यालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सुमारे ८६ हजार रुपये किंमतीचे नामांकित कंपनीचे विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन व युज्ड नॅपकीन डिस्ट्राईंग मशिन विद्यार्थीनींना उपलब्ध करून दिले आहे.

या मशीनचा वापर कसा करावा? यासंबंधी महाविद्यालयातील विद्यार्थीनींना प्रशिक्षण देण्यात येवून कंपनीच्या तंत्रज्ञाने आरोग्यदायी जीवन पद्धती व माहिती या बरोबर मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महाविद्यालयाने विद्यार्थीनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय दर्जाचा टॅायलेट ब्लॅाक उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातच आता या सोई उपलब्ध झाल्याने विद्यार्थीनीमध्ये समाधानचे वातावरण पसरले आहे.