Breaking News

वरवंडी येथे अखंड हरीनाम सप्त्ताह


राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे ह. भ. प. मुळे महाराज यांच्या मार्गदर्शनाकखाली अखंड हरीनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 

यावेळी ह. भ. प. सूर्यवंशीन नाशिक, ह. भ. प. तुकाराम महाराज केशभार, ह. भ. प. सुकदेव महाराज वाघ, ह. भ. प. गया बिडकर, ह. भ. प. अंजली पवार यांची कीर्तनसेवा होणार आहे. दि. २३ मार्च २०१८ रोजी ह. भ. प. रामानंद गिरी महाराज व ह. भ. प. दत्तागिरी महाराज, उंबरे यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्टापणा होणार आहे. हा कार्यक्रम दि. ४ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. शेवटी रामानंद गिरी यांचे काल्याचे कीर्तन होणार असून यानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.