Breaking News

परळी येथे मारामारी; जवान जखमी


परळी आणि कूस बु। येथील युवकांमध्ये पूर्ववैमनस्यातून परळी येथे झालेल्या मारामारीत सैन्यदलातील जवान अरुण जांभळे हे जखमी झाले आहेत. यातील पाच संशयितांना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गौरव मोहन जांभळे याने वडिल मोहन जांभळे यांचा 51 व्या वाढदिवस आयोजित केला, यावेळी हा प्रकार घडला. भांडणे सोडवण्यास गेलेला सैन्यदलातील जवान अरुण जांभळे हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे.