निरव मोदीच्या शेतजमिनीवर फिरवला नांगर
पंजाब नॅशनल बँकेची तेराशे कोटीची फसवणूक करणार्या निरव मोदीने कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील शेतकर्यांना फसवून त्यांची शेतजमीन अत्यंत कमी किमतीत खरेदी केली होती. या शेतजमिनीच्या मूळमालक शेतकर्यांनी आज या जमिनीवर नांगर फिरवत आपला ताबा घेतला. यावेळी काळी आई मुक्ती संग्राम आंदोलन करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला आपल्या उपयोगाची नसलेली जमीन अत्यंत कमी भावात खरेदी करताना तुमच्या मुलांना नोकरी देतो, गावाला वीज मोफत देतो असे आश्वासने देत या जमिनीवर मोठा सौर उर्जा प्रकल्प उभारून कोट्यावधी रुपये कमवनार्या फायरस्टोन कंपनीने आपली कोणतीही आश्वासने तर पूर्ण केलीच नाहीत, उलट याबाबत विचारणा करणार्यांना खा. सुप्रिया सुळेचे नाव घेऊन दम देत गप्प बसविल्याचा गंभीर आरोप यावेळी कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील शेतकर्यांनी केला. पंजाब नॅशनल बँकेची तेराशे कोटीची फसवणूक करून परदेशात पळून जाणार्या नीरव मोदीने आपल्या स्वत:च्या नावावर व आपल्या कंपनीच्या नावे येथे जमिनी घेऊन येथील मूळ मालक असलेल्या शेतकर्यांची फसवणूक केली, असल्यामुळे आज या शेतकर्यांनी या जमिनीत बैलगाडी व ट्रॅक्टरसह जाऊन या जमिनीचा ताबा घेऊन, काळी आई मुक्ती संग्राम आंदोलन करण्यात आले. कर्जत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांचे नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास नगरची पीपल्स हेल्पलाईनचे अॅड. कारभारी गवळी यांची साथ लाभली. या आंदोलनात अॅड. कैलास शेवाळे, मिलिंद बागल, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात आदींसह ग्रामस्थ संतोष माने, जयसिंग वाघमोडे, भाऊसाहेब वाघमोडे, हनुमंत पारखे, अनिल खांडेकर, भीमराव खांडेकर, सत्यभामा माने सुनीता खांडेकर, बबई महारनवर, किसनाबाई खांडेकर, अंजनाबाई हुलगे, रेखा टकले, अनिकेत डाडर, प्रवीण गोयकर, राहुल माने, विजय हूलगुंडे, लक्ष्मण खांडेकर, राहुल खांडेकर, साहिल जगधने, तानाजी पाटील अशोक खांडेकर, विलास हुलगे आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.