तुकाई चारीसाठी 22 मार्चला जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक नगराध्यक्ष राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती
तालुक्यातील तुकाईचारीला मंजुरी मिळण्यासाठी ना. प्रा. राम शिंदे हे शासनस्तरावर विशेष प्रयत्न करत असुन लवकरच कुकडीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा विषय होणार आहेे. त्यामध्ये तुकाईचारीचा समावेश करुन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दि. 22 मार्च रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्जत तालुक्यातील गुरवपींप्री व परिसरातील 27 गावांना वरदान ठरणार्या तुकाईचारीसाठी कर्जत तालुक्यात सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. तुकाई चारी व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहेे, मात्र तुकाईचारीच्या नावाखाली आंदोलन करणार्यांमध्ये काही नेते हा प्रश्न सुटू नये यासाठी प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी केला. हा प्रश्न आगामी काही दिवस असाच चिघळत रहावा अशी काही विरोधी पक्षातील नेत्यांची ईछा आहे. पूर्वीपासून तुकाईचारी व्हावी या विचाराचे अनेक जुने नेते आहेत. ते आजही सत्ताधारी यांचेकडून काम होईल अशा विचाराचे आहेत. मात्र या आंदोलनात सध्या सक्रिय असलेले काही नेते मात्र बाहेर एक व आतून दुसरी भूमीका घेणारे आहेत. ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना आत्ता जनतेचा पुळका आला आहे, ते आपल्या नेत्यांच्या माध्यमातून हा प्रश्न विधानभवनात का उपस्थित करत नाहीत, असा प्रश्न नामदेव राऊत यांनी उपस्थित केला. ना. प्रा. राम शिंदे यांनी तुकाई चारीच्या प्रश्नातील सर्व अडचणींवर संघर्ष करत मात केली आहे. कुकडीच्या पाण्याचे फेरवाटप होणार आहे, त्यामध्येच तुकाईचारीचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा विषय चर्चेत घेऊन त्यास मंजुरी घेतली जाणार आहे. ज्यामुळे या प्रश्नाचा निकाल लागेल असेही सांगितले. गेली अनेक दिवस मंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचेकडे पाठपुरावा करुन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केलेले प्रयत्नच अनेकांना पाहवत नाहीत असेही ते म्हणाले.
तुकाईचारीच्या प्रश्नासाठी ना. प्रा. राम शिंदे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे उपस्थितीत दि. 22 मार्च रोजी मुंबई येथे परिसरातील सरपंच, चेअरमन व प्रमुख नेते मंडळी तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत
मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती खेडकर यांनी दिली. यावेळी शिवसेना नेते बळिराम यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, भाजपाचे तालुका सरचिटणीस अंगद रूपनर, उमेश जेवरे आदी उपस्थित होते.