मंडळ अधिकारी वाघमारे यांना निलंबित करा - शेख
तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांनी श्रीगोंदा महसूल मंडलअधिकारी निलेश वाघमारे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून गौणखनिज तसेच वाळू उपसाची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्या आदेशाने संघटनेचे जामखेड तालुकाध्यक्ष समीर शेख यांनी जामखेडचे तहसीलदार विजय भंडारी व पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा येथील पत्रकार मच्छिंद्र सुद्रीक यांनी अवैध गौणखनिज तसेच वाळू उपसा निवेदनाची बातमी प्रसिध्द केल्याचे मनात राग धरून मंडल अधिकारी वाघमारे यांनी पत्रकार सुद्रीक यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध यावेळी जामखेड येथे करण्यात आला. जिल्ह्यामध्ये सर्वत्र श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू उपसा तसेच गौणखनिज राजरोसपणे महसूल विभागाच्या आशिर्वादाने सुरु आहे. याकडे सबंधित महसुल विभागाचे अधिकारी अर्थपुर्ण सबंधामुळे दुर्लक्ष करत असुन याचा त्रास सामान्यांना होत आहे. अवैध वाळू उपसामुळे तालुक्याचे नाव जिल्ह्यात बदनाम झाले, असुन अनेक वेळा दोन्ही गटात वाळू उपसामुळे वादावादीमुळे अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यामुळे महसूल बरोबरच पोलीस विभागाची ही बदनामी झाली आहे. हा विषय गंभीर असून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत असल्याचे समीर शेख यांनी म्हटले. यावेळी जामखेड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासीर पठाण, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष समीर शेख, नंदूसिंग परदेशी, पोपट गायकवाड, मच्छिंद्र जावळे, फारूक शेख, भरत पाठक, बापुसाहेब गायकवाड, संदेश हजारे, तुषार कोळपकर, गणेश जेव्हरी, आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.