Breaking News

वडाळा महादेव येथे विवीध उपक्रमाने जागतिक महिला दिन साजरा


श्रीरामपुर/ शहर प्रतिनिधी / - तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती भागातील अंगणवाडी क्र ८७ मध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय यांचे अंतर्गत नेहरू युवा केंद्राने विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमात भारतमाता व सरस्वती प्रतीमेचे पुजन करण्यात आले. कवी आनंदा साळवे, बाबासाहेब पवार यांनी महिलाच्या जीवनावर कवीता सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. तर नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी प्रियंका गायकवाड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच मा ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षी देसाई यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मिनाक्षी देसाई यांनी गेल्या ६ ते ७ वर्षापासुन लहान चिमुकल्या मुलांसाठी आपले घर शाळेसाठी उपलब्ध करून दिले आहे. मुलांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये हा उद्देश ठेवुन शाळेसाठी विना मोबदला दिले आहे. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका मंगल गवारे, सुषमा जाधव, पल्लवी राऊत, मंगल कोकाटे, सविता देसाई, सिंधूबाई देसाई, विमल पारे, राठोड विटेकर, पंडीत परदेशी, राऊत, वरपे, बोऱ्हाडे, मनिषा कोकाटे, सई राऊत, साधना राऊत, कांचन देसाई यावेळी सर्व महिलांचा नेहरू युवा केंन्द्र यांचेकडुन मार्गदर्शन पुस्तीका भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमांचे आयोजन मिनाक्षी देसाई यांनी केले. तर सुत्रसंचलन राजेन्द्र देसाई व आभार प्रदर्शन प्रियंका गायकवाड गवारे पल्लवी राऊत यांनी मानले.