Breaking News

देवेंन्द्र कुलथे लायन्स क्लब कडुन सन्मानित


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी /- श्रीरामपुर येथील गृहरक्षक दलातील सैनिक देवेन्द्र कुलथे यांना नुकतेच लायन्स क्लब श्रीरामपुर यांचेकडुन आदर्श होमगार्ड म्हणुन सन्मानित करण्यात आले. 

सालाबादा प्रमाणे विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा आदर्श पुरस्काराने गौरव होत असतो. कुलथे यांच्या विशेष कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले. यासाठी समन्वय अधिकारी शौकत एन. शेख, पोलिस निरीक्षक संपतराव शिन्दे, गोपनीय वार्ता पोहेकाँ. गोरे, दुधाडे, सर्फराज शेख, पिएसआय शेख यांनी कौतुक केले आहे.