Breaking News

हरिहर केशव गोविंद महाराज यात्रा उत्सवाची जय्यत तयारी


उक्कलगाव / प्रतिनिधी / - सालाबाद प्रमाणे यावर्षी येथील जागृत देवस्थान हरिहर केशव गोविन्द महाराज देवस्थान ट्रस्ट व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गुडीपाडव्यानिमित्त होणाऱ्या यात्रा उत्सवाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी दि. ९ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीत पुणतांबा येथील गोदावरी नदीतून कावडीने भक्तगण गंगेचे पाणी आणून त्या पवित्र पाण्याने देवाला स्नान घालून पूजन करण्यात येणार आहे. हरिहर केशव गोविंद महाराजांची पालखी व कवडीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पहिल्या दिवशीच ह.भ.प. उद्धवगीरी महाराज नेवासकर यांचे जयहरी कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी महिला व लहान मुलांसाठी आर्केष्ट्रा व शोभेच्या दारूच्या अतिशबाजीचे नियोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या अखेरच्या दिवशी नामवंत पहिलवानाच्या उपस्थितीत कुस्त्यांचा हंगामा होणार आहे. त्याच दिवशी लोकनाट्य कलेचेही सादरीकरण होणार आहे.