वडुले येथे शिवजयंती उत्साहात साजरी
या वेळी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंतीच्या मिरवणुकीला शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते सतिश नरोटे, प्रमोद गर्जे, शिवाजी कोरडे, गणेश गर्जे, पवन बोरुडे, शुभम गर्जे, महेंद्र भागवत, किरण गर्जे, तुषार देवढे, सागर पवार, आदीसह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते