आगामी काळात सर्व विधानसभा व लोकसभा निवडणुका नियोजनबद्धरित्या लढविणार असल्याची माहिती मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली. निवडणुका संदर्भात आढावा घेण्यासाठी मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, पक्षाचे नेते योगेश परुळेकर जिल्हा दौर्यावर येत असुन शनिवार दि. 31 मार्च रोजी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या दौर्यावर येत आहे. शनिवारी शेवगाव येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात दुपारी 12 वा. शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे . बैठकीत रिटा गुप्ता , योगेश परुळकर , जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व ताकदनिशी मैदानात उतरणार आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत याच पद्धतीने काम करण्याचे आदेश पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहे. या बैठकीत शेवगाव पाथर्डी मतदान संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केले आहे. या बैठकी करिता पाथर्डी तालुकाध्यक्ष गोकुळ भागवत, संतोष जिरेसाळ, लक्ष्मण डांगे, संजय वणवे, प्रवीण शिरसाठ, प्रवीण वाघमारे, बाळा वाघ ,संदीप देशमुख, मंगेश लोंढे, प्रवीण खोमणे, आबासाहेब सपकाळ, आनंद मगर, महेंद्र घनवट, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नियोजन करत आहेत .
मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:45
Rating: 5