Breaking News

आवडत्या क्षेत्रात करिअर करून यशस्वी व्हा - प्रा. गिरिश कुकरेजा

चांदा, दहावी, बारावी नंतर पुढे काय ? हा सध्या सर्वच विद्यार्थी व पालक यांच्या समोर असणारा यक्षप्रश्‍न असून पालकांनी मुलांवर आपल्या अवास्तव अपेक्षा लादू नयेत व मुलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करून यशस्वी व्हावे असे प्रतिपादन न्यू आर्टस् , कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर च्या मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभाग प्रमुख प्रा.गिरिश कुकरेजा यांन जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथे मार्गदर्शन करताना केले.


जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा व शिवतेज मिञ मंडळ ट्रस्ट चांदा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.गिरीश कुकरेजा यांची करिअर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ.दिपक शिंदे उपस्थित होते, प्रा. कुकरेजा यांचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर निवडताना विशेष उपयोगी पडेल व निश्‍चितच विद्यार्थी योग्य क्षेत्रात करिअर करतील असे गौरवोद्गार डॉ. शिंदे यांनी काढले. विद्यार्थ्यांना करिअर निवडून यशस्वी होण्यासाठी अशा कार्यशाळा महत्वाच्या भूमिका बजावतील असे प्रतिपादन प्राचार्य चंद्रकांत दरंदले यांनी प्रास्ताविकातून केले, तसेच प्रा.कुकरेजा यांचे करिअर मार्गदर्शन अनेक यशस्वी विद्यार्थी घडवू शकेल अशा शब्दांत प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रावसाहेब राशीनकर यांनी गौरव केला. प्रा.कुकरेजा यांचा परिचय करून कार्यशाळा आयोजना मागची भूमिका शिवतेज मित्र मंडळ ट्रस्ट चे समन्वयक संतोष कानडे यांनी विशद केली.

कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे उपप्राचार्य नारायण ढवळे, पर्यवेक्षिका अलकाताई शेरकर, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रावसाहेब राशीनकर, प्रा.हराळ, प्रा.शेंडे, प्रा.गव्हाणे, प्रा.भालके, प्रा.शेंडगे, प्रा.तांबे, प्रा.भाबड, प्रा.कासार, प्रा.जाधव, आदींसह शिवतेज मित्रमंडळ ट्रस्ट चे प्रशांत दहातोंडे, देविदास दहातोंडे, विश्‍वास दहातोंडे, विजय वामन, संतोष बोरुडे, अमोल दहातोंडे, भाऊसाहेब जावळे ,सर्व पदाधिकारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.रावसाहेब राशीनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रा. कृष्णा शेंडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.