Breaking News

भगवान महावीर जयंती सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


श्रीरामपूर, येथील दिगंबर जैन स्थानकवासी जैन व संभवनाथ मुर्तीपुजक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.29 मार्च रोजी भगवान महावीर जयंती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रथमच सकल जैन समाजाचा एकत्रित भंडारा होणार आहे. महावीर जयंतीदिनी सकाळी 8 वा. भगवंताच्या पालखीची शोभायात्रा मेनरोडवरील दिगंबर जैन मंदिरापासून प्रारंभ होईल. शोभायात्रा मेनरोड, शिवाजी रोड, शिवाजी चौकातून गांधी पूतळ्यापासून जाईल. शोभायात्रेचा समारोप मंदिराजवळ होणार आहे.

मंदिरामध्ये अभिषेक पुजा होतील. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी 7 वा. मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होतील. सकाळी मंदिरामध्ये पूजाअर्चा होईल. त्यानंतर भगवंताची सजविलेल्या पालखीतून सोहळ्यातील युवक येतील. तर भगवंताचा फोटो सजविलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात येईल. यावेळी कुंभकळसाची बोली घेतलेल्या वैशाली दिनेश बडजाते या अग्रभागी राहतील. मिरवणूक मेनरोड, शिवाजी रोड, भाजीमंडई रोडने श्रीराम मंदिर चौकात येऊन समाप्ती होईल.जैन संघ स्थानकमध्ये शोभायात्रेनंतर नवकार महामंत्राचा जापचा कार्यक्रम व आनंद जैन पाठशाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संभवनाथ मुर्तीपुजक संघ मंदिरात पुजा, अभिषेक आदी कार्यक्रम होतील.

महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाजासाठी रमेश, मनोज, दिनेश, निलेश मुथ्था परिवार, दिनेश स्कुटरवाले परिवाराचे वतीने गौतम प्रसादीचे आयोजन दु.12 वा. होणार आहे. किशोर टॉकीज चौकामध्ये महावीर जयंतीनिमित्त चौकामध्ये आकर्षक सजावट व भगवान महावीर प्रतिमावर आधारीत देखावा सादर करण्यात येणार आहे. महावीर पथ चौकात दिगंबर जैन समाजातर्फे भगवान महावीर प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे. भगवान महावीर जयंती सोहळ्यात सकल जैन समाज व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिगंबर जैन समाज अध्यक्ष संजय कासलीवाल, स्थानकवासी जैन संघ अध्यक्ष रमेश लोढा, संभवनाथ मुर्तीपुजक संघ अध्यक्ष शैलेश बाबरीया यांनी केले आहे.