Breaking News

अक्षय कुमार होणार राज्यसभेचा खासदार ?

नवी दिल्ली : अभिनेत्री रेखा, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, समाजसेविका अनु आगा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या तिघांच्या जागेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार याचे आडाखे बांधण्यास सुरूवात झाली आहे. अभिनेत्री रेखा यांच्या रिक्त होणार्‍या जागेवर कला, साहित्य तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत्त आहे. आपल्या दमदार अभिनयासोबत सामाजिक कार्याने अभिनेता अक्षय कु मारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे रिक्त होणार्‍या राज्यसभेच्या जागेसाठी तो प्रबळ दावेदार मानला जात आहे.