Breaking News

फ्रान्स हल्ल्यातील दहशतवादी ठार

पॅरिस : फ्रान्स येथील सुपरमार्केटवर हल्ला करणार्‍या दहशतवादी फ्रान्स पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठार झाला आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्यात आली आहे. त्याने केलेल्या बेछुट गोळीबारात दोन जण मृत्यूमुखी पडले होते. दक्षिण फ्रान्समधील कारकॅसोन येथे एका सुपरमार्केटमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली होती. यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या बंदुकधारी दहशतवाद्याने सुपरमार्केटमधील काही नागरिकांनादेखील बंधक बनवले होते. फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले होण्याच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे.