Breaking News

मंत्रालयातील उंदीर मारून युती सरकारचा धर्म झाला भ्रष्ट

मुंबई/विशेष प्रतिनिधी :  साधन शुचिता, अध्यात्मिक, धर्म प्रकांड, पारदर्शकता असा चेहरा सांगणार्‍या भाजप सेना युती शासनाच्या प्रशासनाने विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्ट प्रवृत्तीने सरक ार पक्षाच्या मुळ तत्वांचाच बाजार मांडल्याची उपहासात्मक टीका होऊ लागली आहे. मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या प्रक्रियेत आर्थिक भ्रष्टाचार करणार्‍या शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि त्यांच्या सहअभियंत्यांनी श्री गणेशाचे वाहन असलेल्या मुषकाची हत्या करून युती सरकार धर्म भ्रष्ट केला असल्याचा उपहास केला जातोय. दरम्यान युती सरकारचे अंतःवस्रहरण करणार्‍या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


महाराष्ट्रात मंत्रालयातील लाखो उंदीर मारण्याचे प्रकरण गेल्या दोन दिवसांपासून चवीने चर्चेत आहे. आर्थिक प्रमाण लावून घोटाळ्याची आकडेवारी अन्य भ्रष्टाचाराच्या तुलनेत नगण्य असली तरी अपहार करणारी प्रवृत्ती प्रत्येक घोटाळ्यागणिक बेडर होत असल्याचे मंत्रालयातील उंदीर निर्मुलन घोटाळ्याने आणखी एकदा दाखवून दिले आहे.
मंत्रालयाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाकडे असले तरी देखभाल दुरूस्तीची जबाबदारी चंद्रकांत दादा पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे. जीआयडीने दिलेला करोडोंचा निधी कसा खर्च करायचा, कुठे खर्च करायचा आणि किती जिरवायचा याचे अधिकार शहर इलाखा साबांच्या कार्यकारी अ भियंत्यांच्या हातात आहे. त्याच अधिकारांचा गैरवापर होऊन गेल्या पाच सहा वर्षात मंत्रालय आणि आमदार निवास कक्षातील देखभाल दुरूस्ती, पेव्हर ब्लॉक, डेब्रीजची विल्हेवाट अशा विविध कामांमध्ये मनमानी प्रयोजनातून करोडोंची हेराफेरी झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी होऊन कार्यकारी अभियंता आणि काही सहअभियंत्यांवर ठपका ठेवला गेला आहे. तर काही तत्कालीन कार्यकारी अभियंता, सहअभियंत्यांवर चौकशी टांगती तलवार कायम आहे.
सध्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या कार्यकाळातील मंत्रालय डेब्रीज, आमदार कक्ष, अशा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चर्चा रंगली असतांना तसेच मनोरा आमदार निवास इमारतीतील कक्ष दुरूस्ती अपहारात दोषी ठरल्याने त्यांची निलंबन प्रक्रिया प्रलंबित असल्याची चर्चा सुरू असतांना त्याच कार्यकारी अभियंत्यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या प्रक्रियेतही चांगला हात मारल्याचा गौप्यस्फोट भाजपाच्या आमदारांनी विधानसभेत केला आहे. मंत्रालयात असलेले लाखो उंदीर अवघ्या सात दिवसात मारून दाख विण्याचा पराक्रम केलेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके पुन्हा चर्चेत आल्या आहेत. एका बाजूला प्रशासकीय पातळीवर अपहारामुळे प्रज्ञा वाळके कायद्याच्या गुन्हेगार ठरू शक तात. हा सारासार चौकशीचा भाग असला तरी भावनिक पातळीवर मात्र एका विशिष्ट विचारसरणीच्या दृष्टीने त्या धर्म प्रवृतीच्या गुन्हेगार ठरल्या आहेत.


उंदीर हे गणपतीचे वाहन. उंदरातून निघणार्‍या ‘सत्व’ लहरींमुळे मंत्रालयातील नोकरदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि मंत्री वर्गाची अध्यात्मिक पातळी वाढते. त्यामुळे त्यांच्यातील लाचखोरपणा, उद्दामपणा, कामचोरपणा आदी ’तमो’ गुणांचा नाश होवून प्रामाणिकपणा, सहकार्य, विनम्रता, कामसु व्रुत्ती आदी ’सत्व’ गुणांची व्रुद्धी होते. त्यामुळे मंत्रालयातील उंदरांना मारणे हा निव्वळ मुर्खपणाच नसून ते हिंदू धर्मशास्त्राविरोधी आहे. अशी उपहासत्मक चर्चा सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागल्याने धर्म प्रकांड युती सरक ारच्या तत्वांवर प्रज्ञा वाळके यांनी हल्ला केल्याची चर्चा सुचक आहे. या चर्चेनंतर प्रज्ञा वाळके यांच्यावर कारवाई नक्की मानली जात आहे.