आयुक्तांची त्रिसुत्री अन विकास कामांची वाजंत्री पश्चिम प्रभागाची सभा ठरली ऐतिहासिक
नाशिक: शहरातला उच्चभ्रु आणि अत्यंत व्ही आय पी समजल्या जाणारा पश्चिम प्रभाग समिती सदस्यांचे विकास कामांसाठीचे प्रस्तावचं नसल्याने व आयुक्तांच्या विकास कामासाठीच्या त्रीसुत्री मुळे पश्चिम प्रभाग समितीची सभा देखील ऐतिहासिक ठरली . पश्चिम प्रभागाच्या सभापती हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली .
सभा सुरु करण्यासाठी कोरम आवश्यक असून आणि कोरम अभावी सभा सुरु करता येत नसल्याने प्रभागातील सदस्यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी तब्बल चार चार वेळा फोन वरून विनंती करून सभापतीना बोलावणे धाडावे लागत होते.त्यातही अनेक सदस्य महापालिकेत महत्वाच्या पदांवर असल्याने तर काही ज्येष्ठ सदस्य असल्याने प्रभागाच्या सभेला येण्याचे स्वारस्यचं राहीले नसल्याचे प्रभाग सभेत दिसून आले.त्यामुळे केवळ सभापती सह पाच सदस्यांच्या उपस्थितीत औपचारिकता म्हणुन सभा घेत स्थायी समितीच्या नवनियुक्त सभापती यांचा सत्कार करीत सभा गुंडाळावी लागली.
प्रभागातील छोटी छोटी विकास कामे करण्यासाठी व नागरिकांच्या लहान मोठया तक्रारी,समस्या निवारण करण्यासाठी खरं तर प्रभाग समिती आहे. मात्र, आयुक्त मुंढे आल्यानंतर सर्वच विकास कामांची वाजंत्री वाजत त्रीसुत्री तयार झाल्याने आणि अगोदर दिलेले सर्व विकास कामांचे प्रस्ताव बासनात गेल्याच्या भीतीने सदस्यांनी प्रभाग समितीच्या बैठकीला हजेरी लावण्याचे देखील टाळत आहे. केवळ चहा पानासाठीच बैठकीला उपस्थित राहण्यात ही सदस्यांना स्वारस्य राहिलेले नाही.
सदस्यच प्रभागाच्या बैठकीला दांडी मारत असल्याने अधिकारी देखील प्रभागाच्या बैठकीला दांडी मारण्यात पटाईत झाले आहेत. सदस्य बैठकीला येत नसल्याने कोरम पुर्ण होत नाही .त्यामुळे प्रभाग समिती सभापतीना देखील सदस्यांची मनधरणी करून प्रभागाच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी साकडे घालावे लागत असल्याची वेळ सभापती वर आली होती. त्यामुळे यापुढे प्रभाग सभापती व्हावे की नाही असा विचार सुद्धा विद्यमान सदस्य करतील यात तिळमात्र शंका नाही.