Breaking News

नेवासा दिंडीचे १३ ला आयोजन


श्रीरामपूर / प्रतिनिधी / तालुक्यातील वडाळा येथील त्र्यंबकेश्वर मंदिरापासून नेवासा दिंडीचे दि. १३ रोजी सकाळी ८ वा. आयोजन करण्यात आले आहे. ब्रम्हलीन महंत नारायणगीरीजी महाराज गुरुवर्य रामगीरीजी महाराज मठाधीपती सरालाबेट बाल ब्रम्हचारी महाराज नेवासा यांच्या कृपाशिर्वादाने हा कार्यक्रम होणार आहे. पापमोचनी एकादशीनिमित्त ह भ प पुरुषोत्तम कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव मंदिरापासून दिंडीला प्रारंभ होणार आहे. यावेळी भोकर येथील बेरड वस्ती भागात प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीचे स्वागत सुभाष कडू हे करणार आहेत. त्याचप्रमाणे भोकर येथे बाबासाहेब बेरड, भाऊसाहेब बेरड, दत्तात्रय काळे, रामदास बेरड या भाविकांनी दिडीतील सेवेकरी यांचेसाठी खिचडी व केळी प्रसादाची व्यवस्था केली आहेत.