Breaking News

बेवारस वाहनांचा १४ ला लिलाव


सोनई : बऱ्याच वर्षापासून धूळखात व भंगार अवस्थेतील बेवारस पडलेल्या वाहनांचा दि. १४ रोजी लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली. या पोलीस स्टेशनच्या आवारातील मोटार सायकल, जीप आदी वाहनांचा होणार आहे. यामध्ये वाहने विकत घेणाऱ्यांना शासकीय नियमानुसार तांत्रिकदृष्ट्या सर्व बाबी पूर्ण करून लिलावात भाग घेता येणार आहे. त्यास प्राधान्य देऊन वाहने विकत घेण्यासाठी तसेच बेवारस वाहनाबद्दल आपले मालकीचे व ओळखीचे वाहन आढळल्यास मूळ कागदपत्रे दाखवून लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे