Breaking News

छत्रपती शिवरायांचा जयंती सोहळा उत्साहात


जामखेड तालुक्यातील जवळा येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३८८ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त दुर्ग अभ्यासक संदीप कदम यांचे शिवचरित्रावर व्याख्यान ठेवण्यात आले होते. 

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर गावातील मुलींनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जवळा गावातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुलींचे झाज पथक, टिपरी पथक, लेझीम पथक, हलगी पथक हे मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमामुळे जवळा गाव भगवेमय झाले होते.

यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, माजी जि. प. सद्स्य दत्ता वारे, शिवसेना तालुका प्रमुख शहाजी राजेभोसले, जामखेडचे नगरसेवक पवन राळेभात, युवा नेते प्रदीप पाटील, ज्योती क्रांतीचे संस्थापक अजिनाथ हजारे, युवा नेते प्रशांत शिंदे, प्रदीप दळवी, प्रशांत पाटील, दिनेश रोडे, युवा उद्योजक रणजित पाटील आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पठाडे, सुभाष धोत्रे, राहुल पाटील, अवधूत पवार, पप्पू मते, किरण रोडे, राम पाटील, सागर वाळुंजकर, विनोद पाटील, किरण हजारे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सावता हजारे यांनी केले. प्रशांत आयकर यांनी आभार मानले.