Breaking News

जामखेड येथे बौध्द वधूवर सुचक केंद्राचे उदघाटन


जामखेड येथे श्रावस्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या बौध्द वधू वर सूचक केंद्राचे उदघाटन पंचायत समितीचे सभापती प्रा. सुभाष आव्हाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. 

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे, ज्येष्ठ नेते सिद्धार्थ घायतडक, रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शिक्षक नेते निळकंठ घायतडक, बाजार समितीचे संचालक सागर सदाफुले, नगरसेवक राजेश वाव्हळ, मोहन पवार, नगरसेवक निखिल घायतडक, भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष रमेश सदाफुले, भारिपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, ह. गो. कदम, प्रकाश सदाफूले, प्राचार्य विकि घायतडक, गौतम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, बौध्दाचार्य संजय वारभोग, गोकुळ गायकवाड, महेंद्र घायतडक, संतोष गव्हाळे, पोपट घायतडक, माजी सरपंच बाळासाहेब खाडे, प्रभाकर सदाफुले, सुरेखा सदाफुले, पुष्पाताई शिरोळे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष बौद्धाचार्य अशोक आव्हाड, खजिनदार सुहास आव्हाड, सुर्यकांत कदम यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन राहुल अहिरे यांनी केले. अशोक आव्हाड यांनी आभार मानले.