Breaking News

धुळवडीने कुडाळच्या शिमगोत्सवाची सांगता

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, मार्च - गुरुवारपासून सुरु झालेल्या शिमगोत्सवाचा आज दुसरा दिवस म्हणजेच धुलीवंदन. कोकणात त्याला धूळवड असही म्हणतात. याचीच सुरुवात म्हणून संपूर्ण कोकणात एकमेकांना रंग लावून हा धूळवड सण साजरा केला जातो. या धुळवडीच्या उत्साहात कुडाळच्या दीड दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता झाली.

कोकणात दीड दिवसापासून 15 दिवसांपर्यंत शिमगोत्सव साजरा केला जातो. कुडाळचा शिमगा दीड दिवसाचा असतो. होळी झाली कि दुसर्‍या दिवशी धुळवड खेळली जाते. अगदी सकाळपासूनच कुडाळ शहरातले नाके नाके हळू हळू रंग बदलत होते. बच्चे कंपनी, महिला, तरुणाई सारेच रंग, पाणी घेऊन धुळवडीचा आनंद साजरा करत होते. कुठे याला डीजेची जोड मिळली तर कुठे पारंपरिक ढोल ताशांची साथ. पण कुडाळ शहरात उत्साह कुठेच कमी झाला नाही. एकमेकांना रंग लावून त्यात रंगून जाण्याचा आनंद सार्‍या कुडाळ शहराने लुटला. गंमत म्हणून लहान मुलांनी आपल्या दादा, काकांकडून होळीच हक्काने पोस्त सुद्धा मागितले. लोकांनी सुद्धा या मुलांना नाराज केल नाही. एरवी एकमेकांवर राजक ीय रंग उडवणारे लोक प्रतिनिधीसुद्धा एकाच रंगात रंगून गेलेले पाहायला मिळाले.