मालवण किनार्यावर सर्वधर्मीय धुळवड
सिंधुदुर्गनगरी, दि. 03, मार्च - सर्व मालवणवासीय होळीचा आनंद लुटत असताना धुलीवंदनानिमित्त येथील समुद्र किनार्यावर मच्छिमार बांधवांसह मासळी विक्रेते आणि एजंट यांनी सुद्धा रंगाची धुळवड साजरी केली. या वेळी रंगांच्या उधळणीत सर्वधर्मीय या रंगांत मिसळून गेले होते.
धुलीवंदनानिमित्त मालवणच्या समुद्रकिनार्यावर मच्छिमार बांधव, मासळी विक्रेते आणि एजंट यांनी रंगांच्या उधळणीत रंगपंचमी साजरी केली. समुद्रात मासेमारीसाठी गेलेले मच्छिमार सकाळी येथील मासळी मार्केट सामोरच्या समुद्रकिनार्यावर मासे उतरवतात. नंतर या ठिकाणी लिलाव प्रक्रियेस सुरुवात होते. प्रत्येक वर्षीच्या धुलीवंदनादिवशी लिलाव प्र क्रिया संपताच या ठिकाणी रंगांची उधळण करीत मच्छिमार, मासळी एजंट आणि विक्रेते मिळून रंगपंचमी साजरी करतात. यामुळे खर्या अर्थाने सर्वधर्म समभाव जोपासला जाणार्या या सणास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
विविध रंगांची उधळण करीत साजर्या होणार्या या उत्सवात हे रंग एकत्र येतात आणि या दिवशी समुद्रकिनार्यावर साजर्या होणार्या या रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्याची भावनासुद्धा वाढीस लागते.