Breaking News

कुटुंबात महिलांचे योगदान महत्वपूर्ण: सुरपुरीया


सोनई/ प्रतिनिधी/- सर्वसाधारण कुटुंबात दैनंदिन कामाबरोबर आरोग्याची काळजी घेऊन एक सुसंस्कृत दिशा देण्याचे महिलांचे कार्य महत्त्वपूर्ण व योगदान असल्याचे मत नगर अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन नवनीतभाई सुरपुरीया यांनी व्यक्त केले. 

सन्मान महिलांचा या उपक्रमात बँकेचे चेअरमन खा.दिलीप गांधी यांच्या पुढाकाराने महिला दिनाच्या निमित्ताने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात सुरपुरीया बोलत होते. सोनई चे सपोनि. पदी रुपाली शिंदे, पत्रकार अनिता शिंदे, बँकेचे व्हा. चेअरमन अनिता सुरपुरीया, मॅनेजरपदी सिंधूबाई तुवर,व अनिता गुगळे ह्या कॅशियरपदी म्हणून विराजमान होऊन पदभार काही काळ स्वीकारला. त्यामुळे महिला वर्गात चैतन्य व एक नारी शक्तीला बळ मिळाल्याचे दिसले. 

यावेळी ७० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी डॉ.रजनी शिरसाठ, अमृता हापसे, वर्षा चोपडा, संध्या जोशी, विद्या भोसले, प्रेरणा बाफना, नंदा बोगाने, कविता लोया, सुजाता चंदेल, दिपाली दायमा, छाया कुलकर्णी, सुनीता भांड, अनिता भळगट,शोभा दरंदले, प्रिया बाफना, कानडे, मीना जोगदे, शिळा नाचणं, मीरा साळवे. आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनिता नवले, तर आभार राणी चंगेडिया यांनी मानले.