Breaking News

जिल्हा विभाजन झाले तर श्रीरामपुरला जिल्हा करण्याची आग्रही मागणी


बेलपिंपळगाव /प्रतिनिधी /- सध्या अहमदनगर जिल्हा विभाजन चर्चा जोरदार होतांनी दिसत आहे. नगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर हा नविन जिल्हा व्हावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे. श्रीरामपूर जिल्हा झाला तर उत्तरेतील सर्व तालुक्यासाठी ते मध्यवर्ती ठिकाण राहील. या ठिकाणी आरटीओ कार्यालय आहे. आणि जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी साठी श्रीरामपूर हे केंद्रस्थानी राहील. अहमदनगर जिल्हा विभाजन होऊन श्रीरामपूर नविन जिल्हा झाला. तर मोठ्या प्रमाणावर या भागातील समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

नवीन जिल्हा हा श्रीरामपूर व्हावा व त्यात नेवासा तालुका हा श्रीरामपूरला जोडण्यात यावा. श्रीरामपूर जिल्हा झाला तर शासकीय, प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हा नवीन जिल्हा झाला तर जिल्हा परिषदेचे काम अजून गतिमान होईल. 

या वेळी बेळपिंपळगाव उपसरपंच दीपक चौगुले यांनी सांगितले की, नेवासा तालुका जर श्रीरामपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला तर, या भागातील पाटपाणी, कारखानदारी, एमआयडीसी मोठ्या नावारूपाला येणार असून अनेक नवतरुणाच्या हाताला काम मिळेल. तसेच या मध्यवर्ती ठिकाणवरून घोटी बीड राज्यमार्ग काम लवकरच सुरू होणार असून, बेलापूर-परळी, लोहमार्गचे देखील काम लवकरच सुरू होणार असून त्याचा मोठा फायदा होईल. 

या ठिकाणी वरून देशातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक ठिकाण शिर्डी, शिंगणापूर,या ठिकाणी जाण्यासाठी श्रीरामपूर हे मध्यवर्ती ठिकाण असेल. श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती झाली. तर या उद्योग क्षेत्रात वाढीला चांगले दिवस येतील. राज्यमार्ग ,लोहमार्ग याचे काम पूर्ण झाल्यानंतर याचे उत्तरेतील सर्वांसाठी मोठे योगदान ठरणार आहे. अहमदनगर जिल्हा विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा झाली. तर हा जिल्हा साखर सम्राट व धार्मिक, कारखानदारी, सर्वंधर्मसमभाव याची प्रचिती देणारा जिल्हा असणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी जोरावर असून त्यात यश यावे असे नागरिक बोलत आहे. नेवासा तालुका देखील त्यात जोडण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. -