Breaking News

भारतीय संस्कृतीत स्त्रियांना आदराचे स्थान आहे:- प्राचार्य लालचंद आसावा


सात्रळ/ प्रतिनिधी/- भारतीय संस्कृतीत स्त्रियांना आदराचे स्थान आहे. स्त्रियांची सर्वत्र पूजा केली जाते, देवता तिथे तिचे वास्तव्य असते.असे वक्तव्य प्राचार्य लालचंद आसावा यांनी केले. ते राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे महिला दिनाचे महत्व स्पष्ट करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत स्त्रियांचा सर्वत्र अपमान होत आहे. स्त्रियांना आज समाजात उपभोग्य वस्तू असे संबोधून, तो माणूस त्याच्या मार्गाने 'वापरत आहे'. ही एक चिंताजनक गोष्ट आहे. परंतु आपली संस्कृतीत, स्त्रियांचा आदर कसा करता येईल याबद्दल विचार करणे आज आवश्यक बनले आहे.

स्त्रियांच्या उत्थानासाठी स्त्रीलाच आज बाहेर यावे लागेल. हा संदेश सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण समाजाला १५० वर्षांपूर्वीच दिला होता. स्त्रियांच्या समानतेचा, आदर आणि अधिकारांचा संघर्ष, या आधुनिक युगात, स्त्री आजही संघर्षातच झुंजत आहे. आज स्त्रीयांनी आपल्या समान दर्जा, न्याय, सन्मान आणि अधिकार यांच्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांना छळणं तितक्याच वेगाने वाढत आहे. ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. आज समाजात वर्चस्व गाजविणा-या सर्व राजकीय आणि सामाजिक शक्तींना स्त्रियांच्या या हक्काची दखल घ्यावी लागणार आहे. 

राहुरी तालुकयातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शैक्षणिक संकुलात येथे जागतिक महिला दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपशिक्षिका गीतांजली गोसावी या होत्या. तर प्रास्ताविक प्रा.योगीता खपके यांनी केले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संकुलाच्या वतीने प्रमिलाताई बनगये, योगिता खपके, गीतांजली गोसावी, अर्चना बनसोडे, सपना बनसोडे, सुजता शेलार, पल्लवी गावडे, सुशीला थोरात, प्रा.प्रतिभा बोरकर, प्रा.पूनम भालेराव, प्रा.कल्पना दिघे, प्रा.बाचकर, प्रा.भाग्यश्री थेटे, प्रा.नीलिमा घनमोडे, प्रा.रुपाली गाढे, प्रा.सविता पवार,या महिलांचा सत्कार करण्यात आला.

मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमास प्राचार्य एल.बी.आसावा, पर्यवेक्षक बी.बी.गोसावी व रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर हे उपस्थित होते. यावेळी प्रा.संजय डूबे, पोपटराव पवार, शिंदे व थोरात एस.आर यांनी महिलादिनाचे महत्त्व विषद केले.