Breaking News

चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले क्रांती ज्योती इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन


क्रांती ज्योती इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मराठी शाळेसमोरील मोकळ्या मैदानात पार पडले. यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे संस्थापक अजिनाथ हजारे, ज्येष्ठ नेते श्रीरंग कोल्हे, जवळा गावचे सरपंच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, जवळा सेवा सोसायटीचे प्रदीप पाटील, सुरेश पठाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष किसन मेहेर, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष दशरथ हजारे, विष्णू हजारे, मारुती रोडे, सचिव किरण वर्पे, शरद हजारे, संतराम सूळ, महेंद्र खेत्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड म्हणाले की, क्रांती ज्योती इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाने ग्रामीण परिसरात शिक्षणाची सोय केल्याने मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न सुटला आहे. ग्रामीण भागात क्रांती ज्योतीने शैक्षणिक क्षेत्रात जी वाटचाल केली आहे, ती कौतुकास्पद असल्याचे सभापती सुभाष आव्हाड यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मला आमदार झाल्या सारखं वाटतंय या डान्सने संपूर्ण मैदानाला ताल धरायला लावले. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थीनींनी सादर केलेले उखाने. चिमुकल्यांनी प्रभावीपणे ते मांडले तसेच चिमुकल्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाड्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. विद्यार्थ्यांच्या या उत्साहात अजून रंगत तर तेव्हा आली जेव्हा येथे सादर होत असणार्‍या काही दिलखेचक डान्स व देश भक्तिपर गाण्यांच्या विद्यार्थ्यांच्या तालात ताल मिळवत डान्स करून हर्षोल्हास साजरा केला. कार्यक्रमाची सांगता करताना ऐडी यम या नाटकाने जाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सनाप, प्राचार्य खेत्रे, गवसने ज्ञानेश्‍वर, आव्हाड खुशाल यांनी प्ररिश्रम घेतले.प्रास्ताविक क्रांती ज्योतीचे प्रमुख अजिनाथ हजारे यांनी केले