Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी


प्रवरानगर  - येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांना म्यॅक्लेओईड्स फार्मास्युटिकल या कंपनीत नोकरी मिळाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी दिली.

प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे दि. २० आणि २१ मार्च २०१८ रोजी मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये रोहित कसबे, समाधान मस्के, निनाद पाडळकर, सुदेश कदम आणि शुभम घोलप यांची प्रॉडक्टशन विभागात निवड झाली. आरती आढाव, श्रद्धा भांगरे, विनया कदम आणि रेणुका तांबे यांची प्रॉडक्टशन आणि क्वालिटी कंट्रोल या विभागात दमण आणि सारींगम शाखेसाठी निवड झाली आहे. पदविका अभ्यासक्रमातील अक्षय कोळेकर, राहुल वाडेकर, अनिकेत भाग्यवान, ऋषिकेश गुंजाळ आणि समर्थ जाधव, अक्षय उशीर यांची प्रॉडक्टशन विभागात निवड झालीआहे.

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ तसेच प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. एम. एच. कोल्हे, प्रा. टी. पी. डुक्रे यांचे मार्गदर्शन लाभले. नोकरीच्या या संधीबद्दल राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, अतिरिक्त सचिव भारत घोगरे, संचालक हरिभाऊ आहेर आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.