Breaking News

गंजपीरबाबा संदल मिरवणुक उत्साहात


सालाबादप्रमाणे या वर्षी गंजपीर बाबा संदल मिरवणूक कार्यक्रम उत्साहास पार पडला. बंगलागल्ली खर्डा येथील तरुण मंडळामार्फत दरवर्षी या संदल मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या मिरवणुकीमध्ये बॅन्ड पथकासह पारंपारिक लेझिम पथकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अबालवृद्धांसह एकत्र आले होते. या कार्यक्रमात बंगला गल्ली तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंजपीर बाबा हे खर्डा व परिसरातील सर्व हिंदू - मुस्लिम बांधवांचे दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भाविक प्रतिरोज विशेषतः गुरुवारी येथे मोठ्या श्रद्धेने येतात. हे मंदीर टेकडीवर आहे. परंतू मंदिरापर्यंत जाण्यास रस्ता नाही. याठिकाणी जाण्यासाठी रस्ता करावा अशी सर्व ग्रामस्थांनी मागणी केली आहे. या मिरवणुकीस जय भवानी युवा तरुण मंडळ बंगला गल्लीचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला.