Breaking News

चीनमध्ये हुकुमशाही पर्वाची नांदी !


बीजिंग : चीनमध्ये आता 64 वषीय शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची निर्धारित मर्यादा संपुष्टात आणल्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आता आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहू शकतात. चीनच्या संसदेने दोन कार्यकाळाची अ निवार्यता दोन तृतीयांश बहुमताने संपुष्टात आणली. या निर्णयानुसार चीनमध्ये मोठे संवैधानिक बदल करण्यात आले आहेत. नवीन घटनादुरुस्ती मंजूर करून चीनच्या संसदेने साऱया जगाचे लक्ष वेधले आहे. या नवीन कायद्याच्या आधारे चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान राहू शकतात अशी भीती निर्माण झाली आहे.