Breaking News

कुरंगनी वणव्यात 9 गिर्यारोहकांचा मृत्यू

चेन्नई : थेनी जिल्ह्यातील कुरंगनी हिल्स येथील जंगलाला लागलेल्या वणव्यात 9 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री लागलेल्या वणव्यात 36 गिर्यारोहक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. जीव गमावलेल्यांमध्ये चार महिला, चार पुरूष तसेच एका लहानग्याचा समावेश आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्र्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर 10 कमांडोचे पथक रवाना करण्यात आले. त्यांच्याकडे औषधे तसेच आधुनिक संपर्कयंत्रणा आहे.दरम्यान, भारतीय हवाईदलाच्या अधिकार्‍यांनी परिस्थितीची हवाई पाहणी केली. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 गिर्यारोहकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली.