Breaking News

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सुयोग्य वापर हवा : डॉ. खंडागळे जागतिक जलदिन उत्साहात


पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सुयोग्य उपयोग करण्याचे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. खंडागळे यांनी केले. प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात जागतिक जलदिननिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पाणी वापराबाबत जनजागृती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी बोलतांना प्रा. रमेश जाधव म्हणाले, की रा.से.यो. स्वयंसेवकांनी गावातील जलसंधारण कार्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन सामाजिक कार्य करावे. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. निलेश दळे, प्रा. रोहित उंबरकर, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. संदीप पठारे यांनी केले.