Breaking News

वाहतुकीस अड़थळा ठरणार्‍या काटेरी झुड़पांना हटवण्याची मागणी.


शेवगाव - नेवासा राजमार्गावर दुतर्फा झाड़ांची संख्या घटलेली असून त्याऐवजी वाहनांना अड़थळा ठरेल अशा वेड्याबाभळी सारख्या झुड़पांचीच गर्दी झालेली असून काही ठिकाणी तर समोरून येणारी वाहणे देखील एकमेकांना दिसणे अशक्य होत आहे. अशा वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वळणांच्या ठिकाणी तर वाहन अधांतरीच चालवावे लागते. तेव्हा शेवगाव - नेवासा रोड़वरील दत्त पाटी, गुंफा गावाजवळील काळेश्‍वर देवस्थान, भायगांव, काळेगांव या दरम्यान अनेक ठिकाणी ही झुड़पे वाढलेली असून आता साखर कारखाने सुरू असून वाहनांच्या सख्येत मोठी वाढ झालेली आहे. काटेरी झुड़पे तोड़ण्यात यावे व रोड़ला पड़लेल्या कपारी भरण्यात याव्यात. तेव्हा संबंधित खात्याने ही वाढलेली काटेरी झुड़पे तोड़ण्याचे व कपारी भरण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी वाहन चालक - मालक व प्रवाशी करत आहे.