Breaking News

दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागातील भोसले जलतरणासमोरील एका प्रिंटिंग प्रेसला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सोबतच या आगीची शेजारी दुकानांना झळ बसली असून, चार दुकाने खाक झाली आहेत. बुधवारी पहाटे ही घटना घडली. नरपतसिंग यशवंतसिंग राजपूत (वय-23, मूळ- राजस्थान), लक्ष्मणराम उमाराम सुतार (वय- 33, रा. निगडी, मूळ- राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, शिवाजीनगर बस स्टँड परिसरातील हिमालया हाईट्स इमारतीत असलेल्या प्रिटिंग प्रेसला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या प्रिंटिंग प्रेसमध्ये मिठाई बॉक्सच्या प्रिटिंगचे काम चालते. तसेच प्रेसच्या पोटमाळ्यावर फर्निचरचे काम चालू होते. काल रात्री उशिरापर्यंत फर्निचरचे काम सुरू होते.काल रात्री फर्निचरचे काम करणारे राजपूत व सुतार हे कामगार उशिरपर्यंत काम करत होते. त्यानंतर ते तेथेच झोपले. मात्र, पहाटे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने आग लागली. मात्र, प्रेसला बाहेरून कु लूप घातल्याने या कामगारांना बाहेर जाण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्यांनी आतून आरडाओरड केल्याने बाहेरील नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती कळवली. मात्र, तो आग भडकली होती. यात या दोन कामगारांचा आत होरपळून मृत्यू झाला तर भीषण आगीने शेजारील चार दुकाने जळूक खाक झाली.